महसूल विभागात मोठेे बदल l भोगवटादार क्रमांक 2 जमिनीसाठी नवीन निर्णय
पूर्वीपासून चालत आलेले भोगवटादार क्रमांक 2 मधील जमिनींसाठी शेतकऱ्यांना नव्या अडचणी येत होत्या. कालांतराने त्यामध्ये सुधारणा होऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी यांचा समावेश केलेला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. जमीन मोजणी बाबत सरकारने खूप मोठी भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वात मोठी व्यवस्था सरकारद्वारे उभारण्यात येत आहे, तरी भौगोलिक परिस्थिती पाहता यामध्ये कितपत योग्य ठरेल किंवा यशस्वी होईल हे सांगता येत नाही. राज्य सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांसाठी जिवंत सातबारा मोहीम, 12 फुटाचा शेत रस्ता , 200 रुपयात पोटहिस्सा मोजणी , घरकुल लाभार्थ्यासाठी मोफत वाळू आणि भोगवटादार क्रमांक दोन मधील शेतकऱ्यांसाठी कर्जाची पूर्तता या गोष्टींचा समावेश आहे. जिवंत सातबारा मोहीम पूर्वीपासून चालत आलेले महाराष्ट्रातील सातबारे त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आणि वेगवेगळ्या बाबी यांचा समावेश आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही निरोपयोगी आणि ...