टेस्लाच्या सीईओला तब्बल इतका पगार l आज पर्यंतचे रेकॉर्ड टाकले मागे
आज भारतामध्ये कितीतरी कंपनी आहेत यामध्ये पगार हा विषय वेगळीच कन्सेप्ट आहे. जगात मोठ मोठ्या कंपन्या असला तरी त्यांचे असलेले सीईओ यांना भरमसाठ पगार आहे. ज्याची कोणी कल्पना करू शकत नाही. जागतिक पातळीवर हा पगार घेणाऱ्यांचा आकडा जास्त असला तरी आज टेस्ला कंपनीचे सीईओ यांचा पगार ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण हा पगार इतका आहे की याने आज पर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीमध्ये सीईओ पदावर काम करणारे वैभव तनेजा यांच्या पगारामुळे त्यांचे जगभरात कौतुक होत आहे. हिंदुस्तानी वंशाचे वैभव तनेजा यांच्या पगारामुळे ते चर्चेत आलेले आहेत. वैभव तनेजा हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ ठरले आहेत. भारतीय वंशाचे वैभव तनेजा हे त्यांच्या पगारामुळे चर्चेत आले असले तरी त्यांनी गुगलचे सीईओ सुंदर पीचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना सुद्धा मागे टाकले आहे.
वैभव तनेजा यांना 2024 मध्ये तब्बल 139.5 मिलियन डॉलर म्हणजे 11,95,20,06,911 इतका पगार मिळाला आहे ज्यामुळे ते इतके चर्चेत आलेले आहेत. आजची पार्श्वभूमी पाहता टेस्ला कंपनीमध्ये मिळलेला पगार हा सर्वाधिक आहे.
गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेट याने 2024 मध्ये सुंदर पीचाई यांना तब्बल 10.73 मिलियन डॉलर्स इतका पगार दिला होता, तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना 79.1 मिलियन डॉलर इतका पगार दिला होता. वैभव तनेजा यांची बेसिक सॅलरी चार लाख डॉलर असली तरी त्यांना स्टॉक्स, इक्विटी अवॉर्ड मधून इतका पैसा मिळाला आहे. आज भारत देशाला अभिमान जागृत करून देणारे वैभव तनेजा हे कार्पोरेट मध्ये सर्वाधिक पगार घेणारे फायनान्स एक्झिक्युटिव्ह बनले आहेत.
वैभव तनेजा यांना मिळणारे 139.5 मिलियन डॉलर वेतन हे स्टॉक च्या रूपात मिळाले आहे आणि हे स्टॉक यांना पुढील चार वर्षे मिळणार आहेत.
दिल्ली विद्यापीठातून शिक्षण
भारतातील प्रसिद्ध दिल्ली विद्यापीठ येथून वैभव तनेजा यांनी शिक्षण घेतले आहे. 1999 मध्ये वैभव तनेजा यांनी कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. 2000 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट मधून चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळाली आहे. 2006 मध्ये अमेरिकेमध्ये सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट मधून पदवी मिळवली आहे. वैभव तनेजा यांनी 17 वर्षापासून अमेरिका आणि भारत या ठिकाणी काम केले आहे.
2016 मध्ये त्यांनी सोलार सिटी कंपनीमध्ये काम केले आहे परंतु लगेच 2017 मध्ये या कंपनीचे टेस्टला कंपनीमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर वैभव तनुजा असिस्टंट कार्पोरेट कंट्रोलर बनले. 2019 मध्ये चीफ अकाउंटंट ऑफिसर बनले आणि 2023 मध्ये त्यांना टेस्ला कंपनीच्या सीईओ पदी बसण्याची संधी मिळाली.
Comments
Post a Comment