महसूल विभागात मोठेे बदल l भोगवटादार क्रमांक 2 जमिनीसाठी नवीन निर्णय

       पूर्वीपासून चालत आलेले भोगवटादार क्रमांक 2 मधील जमिनींसाठी शेतकऱ्यांना नव्या अडचणी येत होत्या. कालांतराने त्यामध्ये सुधारणा होऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी यांचा समावेश केलेला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. जमीन मोजणी बाबत सरकारने खूप मोठी भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वात मोठी व्यवस्था सरकारद्वारे उभारण्यात येत आहे, तरी भौगोलिक परिस्थिती पाहता यामध्ये कितपत योग्य ठरेल किंवा यशस्वी होईल हे सांगता येत नाही. राज्य सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांसाठी जिवंत सातबारा मोहीम, 12 फुटाचा शेत रस्ता, 200 रुपयात पोटहिस्सा मोजणी, घरकुल लाभार्थ्यासाठी मोफत वाळू आणि भोगवटादार क्रमांक दोन मधील शेतकऱ्यांसाठी कर्जाची पूर्तता  या गोष्टींचा समावेश आहे.

 जिवंत सातबारा मोहीम 

 पूर्वीपासून चालत आलेले महाराष्ट्रातील सातबारे त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी आणि वेगवेगळ्या बाबी यांचा समावेश आहे.
 पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही निरोपयोगी आणि अयोग्य नोंदी यांचा हाहाकार माजला आहे. 
       महाराष्ट्र मध्ये कालबाह्य झालेल्या नोंदी आणि निरोपयोगी नोंदी असल्यामुळे सरकारने जिवंत सातबारा मोहीम चालू केली आहे त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होईल. जिवंत सातबारा मोहिमेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी त्यामध्ये जमीन विक्री खरेदी व्यवहार, कर्ज प्रकरणे व शासकीय योजनांचा लाभ या बाबींचा समावेश आहे.
   
 पूर्ण राज्यभर तलाठी ही मोहीम राबवत असल्यामुळे त्यांना जुने आणि काही शेरे दुरुस्त करण्याच्या आदेश दिले आहेत. अवघ्या आठ दहा दिवसात पाच लाख उताऱ्यावरील वारस नोंदी झालेली आहेत, परंतु एकूण 22 लाख उताऱ्यांच्या नोंदी करण्याचे लक्ष ठेवले आहे.

 शेत रस्ता याची रुंदी आता 12 फूट होणार 

 पूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केल्यामुळे आता शेत रस्त्याची रुंदी 12 फुट करण्याची मान्यता मिळाली आहे. पूर्वी मागील काळात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर शेतामध्ये नेण्यासाठी कमी रस्ता असल्यामुळे अडचण येत होती परंतु नवीन शासनाच्या निर्णयामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आहेत.

 200 रुपयात पोटहिस्सा मोजणी

 महाराष्ट्रामध्ये पूर्वी मोजणीसाठी हजारो रुपयांचा खर्च व्हायचा पण शासनाच्या नवीन नियमानुसार आता पोट हिस्सा मोजणी  केवळ 200 रुपयात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आता बचत होणार आहे.

 भोगवटादार क्रमांक 2 ची जमीन कर्जासाठी पात्र 

 बरीच वर्षे झाली शेतकऱ्यांना भोगवटादार क्रमांक 2 मधील कर्जासाठी अडचण येत होती. शासनाच्या नवीन नियमानुसार आता वर्ग दोन ची जमीन कर्जासाठी पात्र होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक वित्त पुरवठा होण्यास मदत होईल आणि वेगवेगळ्या प्रकारे लाभ मिळवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा होऊ शकतो.

 घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू 

 महाराष्ट्र मध्ये घरकुल ही संकल्पना पूर्वीपासून आहे परंतु पूर्वी अनुदान आणि प्रत्यक्षात लागणारा खर्च यामध्ये तुफावत होती. शासनाच्या नवीन नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रास एवढी वाळू मिळणार आहे. या नवीन निर्णयामुळे नवीन घरकुल लाभार्थी यांना चांगलाच फायदा होणार आहे 










Comments

Popular posts from this blog

अभिनंदन टेस्ला ब्रँड येणार महाराष्ट्रात

टेस्लाच्या सीईओला तब्बल इतका पगार l आज पर्यंतचे रेकॉर्ड टाकले मागे

सावधान स्मार्ट सिटी बाबत भारतातील आव्हाने