अभिनंदन टेस्ला ब्रँड येणार महाराष्ट्रात

     प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची सुरुवात सातारा जिल्ह्यात होऊ शकते. जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनासाठी ही कंपनी जागा शोधत आहे, यामध्ये सुट्टे भाग जोडण्याचा प्रकल्प याबाबत कंपनी जागा शोधत आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील तरुणांना किंवा बाकीच्या जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. काही दिवसांपूर्वी टेस्ला  इंडियाचे प्रमुख मेनन यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर हैदराबाद सोबत युनिट निर्माण करण्याचे काम साताऱ्यात करण्यात येत आहे.



 अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या व्यापार करारासंबंधीत चर्चा सुरू आहे.त्यामध्ये ऑटोमोबाईल वरील शुल्क सवलतीचा समावेश आहे भारत 0.1 टक्के दराने गाड्यांचे पार्ट आयात कर भरण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. त्यामुळे अमेरिका तिच्या 25% शुल्क सवलत देईल. टेस्ला  दुसऱ्या नामांकित कंपनी सोबत संयुक्त उद्योग तयार करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला इलेक्ट्रिक वाहनांचे सुट्टे भाग जोडण्याचे काम (सीकेडी ) भारतात सुरू करत आहे. यामुळे आया शुल्क कमी होईल व स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल. भारतात टेसलाची प्रस्तावित तारीख वर्षाच्या अखेरीपर्यंत असू शकते यावर्षी आयात गाड्यांची विक्री केली जाणार आहे.

 सध्या टेस्ला जबाबदार व्यवहार करणारा भारतीय रियल इस्टेट भागीदार शोधत आहे. ही प्रक्रिया मागील एक वर्षापासून सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. काही दिवसानंतर या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र किंवा बेरोजगारांना सुवर्णसंधी मिळू शकते. कंपनीच्या अंतर्गत स्थानिक शिक्षण व आरोग्य क्षेत्राला ही मदत मिळू शकते.

 दोन वर्षात टेस्ला चे कामकाज सुरू होणार 

 टेस्ला कंपनी सुरुवातीच्या काळात गाड्या आयात करणार आहेत. पूर्ण उत्पादन व्यवस्था उभी राहण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागतील त्यामध्ये सात-आठ महिने परवानगी व नियमक मंजुरीसाठी लागणार आहेत.

 सातारा जिल्ह्यावर विकासाचा होणारा परिणाम 

 सातारा जिल्ह्यात टेस्ला कंपनी वेगळे पार्ट जोडण्याचे काम सुरू करणार असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक तरुणांसाठी नोकरीच्या संधी वाढतील त्यामध्ये कुशल कामगार असतील व अकुशल कामगार असतील यासाठी नोकऱ्यांच्या संधी वाढतील. त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये उदा. सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक, केटरिंग यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. औद्योगिक विकासामुळे पाणी, रस्ते, वीज यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना शाश्वत नोकरी मिळण्याची संधी निर्माण होईल. या कंपनीच्या प्रस्तावामुळे साताराच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर याचा चांगला परिणाम होईल.

Comments

Popular posts from this blog

टेस्लाच्या सीईओला तब्बल इतका पगार l आज पर्यंतचे रेकॉर्ड टाकले मागे

सावधान स्मार्ट सिटी बाबत भारतातील आव्हाने