सावधान स्मार्ट सिटी बाबत भारतातील आव्हाने
भारत सरकारने 2015 मध्ये स्मार्ट सिटी एक संकल्पना अमलात आणली त्यामुळे शहरांना किंमत आली आणि याचा उद्देश असा की लोकांचे जीवनमान सुधारले पाहिजे व काही पायाभूत सुविधा असतील किंवा नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा पुरवणे हा आहे. तरी काही शहरांमध्ये मोठ्या झपाट्याने काम चालू असले तरी काही ठिकाणी समस्या असतातच. भारत सरकारचे लक्ष हे लोकांना पायाभूत सुविधा मिळवून देणे हे असले तरी प्रासंगिक दृष्टिकोनातून भारतात अनेक अडचणी निर्माण होतात. स्मार्ट सिटी बाबत सरकारचे स्पष्ट मत असले तरी काही गोष्टी ज्यामुळे केंद्र सरकारच्या या मिशनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.
1. निधीची कमतरता
भारत सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी मिशनसाठी केंद्र सरकारने 1.67 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती पण या निधीचा वापर अनेक शहरांमध्ये अपेक्षेनुसार झाला नाही. केंद्र सरकारच्या अपेक्षेप्रमाणे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांना असे म्हणावेसे योगदान मिळाले नाही थोडक्यातच की निधीची कमतरता ही भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनच्या अडचण निर्माण करणारी पहिली समस्या आहे.
2. प्रशासकीय बाबी
केंद्र सरकारच्या या स्मार्ट सिटी मिशन मध्ये अधिकाऱ्यांचे नियुक्ती मध्ये स्पष्ट धोरण नसल्यामुळे या स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी फार वेळ झाला आणि राज्यस्तरीय बैठका या वेळेप्रमाणे झाल्या नाहीत.
3. नागरिकांचा सहभाग आणि जनजागृतीचा अभाव
स्मार्ट सिटी तंत्रज्ञान हे आजच्या काळातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे परंतु अनेक शहरांमध्ये नागरिकांचा सहभाग कमी असल्यामुळे प्रकल्पाला पाहिजे असं यश मिळालं नाही. नागरिकांच्या पायाभूत सुविधांची सुधारणा करण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने हा प्रयत्न केला असला तरी समाजामध्ये असणारा जागरूकतेचा अभाव यामुळे स्मार्ट सिटी मिशन च्या नियोजनामध्ये बाधा आणणारी बाब आहे.
4. नियोजनाची कमतरता
भारत सरकारने सुरू केलेले स्मार्ट सिटी मिशन 2015 रोजी सुरू झाले परंतु भारताच्या विस्तारानुसार मिशन सुरू करण्याबाबत फारच उशीर झाला. स्मार्ट सिटी बाबत आखण्यात येणारा आराखडा हा आता तयार झाला असला तरी शहरी भागांचा फैलाव हा फार पूर्वीपासून आहे. स्मार्ट सिटी बाबत नियोजन करण्यासाठी शहरांचा फैलाव हा नियोजन करण्यास अडचणीत येण्यासारखे आहे.
भारत सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये अनेक बाबी किंवा अनेक मुद्दे उपस्थित होत असले तरी नागरिकांच्या भविष्यासाठी किंवा पायाभूत सुविधांसाठी त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. आजच्या गतिशील जीवनामध्ये हे प्रकल्प भारताला नवीन ओळख निर्माण करून देतील ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था असेल किंवा आपली ओळख जागतिक पटलावर निर्माण होईल ज्यामुळे परकीय गुंतवणुकीला चालना मिळेल.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काही आव्हाने असली तरी याबाबत उपाययोजना ही करणे गरजेचे आहे त्या साठी काही विशिष्ट बाबीवर लक्ष देणे गरजेचे आहे
1. नागरिकांचा सक्रिय सहभाग
भारत सरकारने सुरू केलेले स्मार्ट सिटी मिशन ला जवळ जवळ दहा वर्षे पूर्ण होत आली. तरी त्याची अंमलबजावणी काही ठिकाणी अयशस्वी ठरली असली तरी त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला किंवा त्याबाबत पाठिंबा असणे हे काही दिवसाच्या असणारे स्मार्ट सिटी मिशन थोड्याच दिवसात पूर्ण होईल.
2. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
भारतीय नागरिकांसाठी स्वच्छता वाहतूक जलपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे ज्यामुळे भारत सरकारचे मिशन स्मार्ट सिटी पूर्णतः निर्माण होईल.
3. शहरी नियोजन
शहरात राहणाऱ्यांची संख्या लक्षात घेता शहरांमध्ये होणारा अनियंत्रित फैलाव यावर नियोजन करण्याची गरज आहे ज्यामुळे योग्य अशी स्मार्ट सिटी ची मांडणी पूर्ण होऊ शकते.
4. भ्रष्टाचाराविरोधी उपाय योजना
स्मार्ट सिटी साठी येणारा निधी हा सर्वात जास्त असला तरी त्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असू शकते त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी अशा वाईट गोष्टींना आळा घातलाच पाहिजे. सरकारने ह्यावर पाय बंद घातला तर लवकरात लवकर जो भरकटणारा निधी आहे त्यावर काम सुरू होईल.
Comments
Post a Comment